नांदेडधार्मिक

Akhand Harinam ; असरजन येथील अखंड हरिनाम सप्ताहयाची हभप आनंदराव पाटील वळशिंगे यांच्या काल्याच्या किर्तनाने सागंता

नवीन नांदेड l मोजे असरजन येथील अखंड हरिनाम सप्ताह सांगता हभप आनंदराव पाटील वळशिंगे हरबळकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहयाची सांगता झाली.

मोजे असरजन येथे 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, गाथा पारायण श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती व कळशारोहण सोहळ्याचे, लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मौजे असर्जन ता. जि. नांदेड येथे श्री विठ्ठल रुक्मीणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापण सोहळा व श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळ्या निमित्त गुरुवर्य आनंदगीर महाराज, कै.आनंद भारती महाराज असर्जनकर, के.भगवान महाराज असर्जनकर,गुरुवर्य दत्तगीर महाराज मठसंस्थान असर्जन, हभप.भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या कृपा शिर्वादाने 31 जानेवारी दुपारी भागवत कथेता सुरुवात झाली,भागवताचार्य हभप पुनम दिदी गिरी आळंदीकर यांच्या समुधर वाणीतून भावार्थ रामायण कथा आयोजित करण्यात आले.

तर श्री गाथा पारायण व्यासपीठ नेतृत्व श्री ह.भ.प.भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर , हभप गंगाधर महाराज बोराळकर,हभप परमेश्वर महाराज कंधारकर,हभप वैष्णवीताई गौड सोनखेडकर,हभप राम महाराज सुगावकर, हभप राधाताई पांचाळ आव्हाईकर, यांच्ये किर्तन लक्ष्मण शक्ती सोहळ्यास सुरूवात झाली, हभप आनंदराव पाटील वळशिंगे हरबळकर यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

राम भारती महाराज मोहनपुरा व संत दतागिर महाराज असरजनकर ,संत समगिर महाराज यांच्या सह अनेक संत महंत उपस्थित होते. 7 फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

काल्याच्या सांगता प्रसंगी हभप वळशिंगकर यांनी श्रीकृष्ण लिला यासह अनेक प्रसंग सांगितले. हा अखंड सप्ताह यशस्वीतेसाठी समस्त गावकरी मंडळी, असर्जन, ता.जि.नांदेड व्यवस्थापक वीर शिवबा नवयुवक मित्रमंडळ, असर्जन, ता. जि. नांदेड यांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button