Akhand Harinam ; असरजन येथील अखंड हरिनाम सप्ताहयाची हभप आनंदराव पाटील वळशिंगे यांच्या काल्याच्या किर्तनाने सागंता
नवीन नांदेड l मोजे असरजन येथील अखंड हरिनाम सप्ताह सांगता हभप आनंदराव पाटील वळशिंगे हरबळकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहयाची सांगता झाली.
मोजे असरजन येथे 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, गाथा पारायण श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती व कळशारोहण सोहळ्याचे, लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मौजे असर्जन ता. जि. नांदेड येथे श्री विठ्ठल रुक्मीणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापण सोहळा व श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळ्या निमित्त गुरुवर्य आनंदगीर महाराज, कै.आनंद भारती महाराज असर्जनकर, के.भगवान महाराज असर्जनकर,गुरुवर्य दत्तगीर महाराज मठसंस्थान असर्जन, हभप.भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या कृपा शिर्वादाने 31 जानेवारी दुपारी भागवत कथेता सुरुवात झाली,भागवताचार्य हभप पुनम दिद...
