कृषीनांदेडव्हिडीओ

farmers : मान्सूनपूर्व पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतीकामाला मजूर मिळत नसल्याने आधुनिक पद्धतीने शेती कामे केली जात आहेत. असे असताना आजही ग्रामीण भागातील शेतकरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीने शेती कामे करताना दिसून येत आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वीप्रमाणे शेतीची मशागत, वखर पाळीचे कामे आपल्या सर्जा राजाला सोबत घेऊन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

IMG 20250604 085131 farmers : मान्सूनपूर्व पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

यंदा पावसाला में महिन्यात सुरुवात झाली. त्यामुळे 15 दिवस अगोदर पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची शेती कामे ठप्प झाली होती. मात्र दिनांक 01 जूनपासून पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागत करण्यासाठी वेळ मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर शेतीची उन्हाळी मशागत केली. त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा एकदा मशागत करण्यास भाग पाडले आहे. एकूणच शेतीची अंतिम मशागतीची कामे जोरात सुरु असून, यंदा जून महिन्यात खरिपाच्या पेरण्या उरकतील अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!