नांदेड

ॲड. दिलीप ठाकूर राबवितात कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम – सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा -NNL

नांदेड| गेल्या ४५ महिन्यापासून अखंडित सुरू असलेला कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे राबवीत असल्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन जर मोठमोठ्या शहरात असे उपक्रम राबविले तर निरोगी भारत बनण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी केले असून यावेळी ५२ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळ वितरित करण्यात आले.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम नियमित सुरू आहे. सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकी वर बसवून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना शहरातील विविध भागातून गोवर्धन घाट पुलाखाली आणले. स्वयंसेवक राजूअण्णा पस्पुनुर यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना निलेश यांने साबण लावून स्नान घातले.त्यानंतर शशीमोहन नंदा यांच्या हस्ते अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले.

ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात येते.पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःला नवल वाटले. डॉ. दि.बा. जोशी यांच्या स्टाफने आजारी असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांची मलमपट्टी केली. मोफत औषधे दिली. हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठ अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट दिली. कायापालट उपक्रम संपल्यानंतर ॲड.चिरंजीलाल दागडिया यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची स्वच्छता करण्यात आली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button