नांदेडमहाराष्ट्र

WhatsApp chatbot : 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सअॅप चॅटबॉट कार्यान्वित

नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने आधुनिक व नागरिकाभिमुख व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्व माहिती, सेवा आणि तक्रार निवारण प्रक्रिया नागरिकांना दोन क्लिकमध्ये उपलब्ध व्हावी, यासाठी ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. नागरिकांनी या प्रणालीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या संकल्पनेतून विकसित झालेला हा चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध सेवांची सर्वसमावेशक माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन करावा किंवा 8668223326 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवून चॅटबॉट सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चॅटबॉटद्वारे मिळणाऱ्या मुख्य सेवा : जिल्हाधिकारी कार्यालयाची परिपूर्ण माहिती, अधिकारी व विभागनिहाय संपर्क तपशील, विविध विभाग व शासकीय योजनांची माहिती, नागरी सेवा, आरटीएस सुविधा, जमीन व महसूल संबंधित माहिती, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक सूचना, तक्रार नोंदणी व तक्रार निवारण दुवे, जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखांची संपूर्ण माहिती.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक शासकीय माहिती जलद, पारदर्शक आणि तांत्रिक पद्धतीने मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. विविध सेवांना एकाच व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना शासनाशी संवाद साधणे अधिक सुलभ, सोयीस्कर आणि परिणामकारक ठरणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button