WhatsApp chatbot : 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सअॅप चॅटबॉट कार्यान्वित
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने आधुनिक व नागरिकाभिमुख व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्व माहिती, सेवा आणि तक्रार निवारण प्रक्रिया नागरिकांना दोन क्लिकमध्ये उपलब्ध व्हावी, यासाठी ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. नागरिकांनी या प्रणालीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या संकल्पनेतून विकसित झालेला हा चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध सेवांची सर्वसमावेशक माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन करावा किंवा 8668223326 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवून चॅटबॉट सुविधेचा लाभ घ्...
