किनवट, परमेश्वर पेशवे| गेल्या अनेक दिवसाच्या कालावधीनंतर किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात गुटखा विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध दिनांक 24 रोजी कार्यवाही करण्यात आली. शिवनी येथील व्यापाऱ्याने किराणा दुकानांमध्ये गुटखा बाळगल्याप्रकरणी दुकानदारावर अन्न औषधी प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही पहिलीच कारवाई झाल्याची घटना पाहावयास मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या भागात रासरोसपणे गुटख्याची विक्री होत असते. गेल्या एक महिन्यापूर्वी नांदेड चे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गुटखाबंदी करण्यासाठी एक पथक सुद्धा नेमणूक केले होते. शहाजी उमापाचे पथक शहरात दाखल होणार म्हणताच पान टपरी चालक व दुकानदारांनी दुकाने बंद केल्याचे चित्र मात्र ग्रामीण भागातून पाहाव्यास मिळत होते? या पथकाची धास्ती गुटखा विक्रेत्यांनी चांगलीच घेतली पण पथकाच्या माध्यमातून किती कार्यवाही झाल्यात याचा शोध लागू शकला नाही?
त्यातच दिनांक 24 रोजी अन्य औषधी प्रशासन च्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पथक प्रमुख सतीश हाके, यांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे एक लाख ३५ हजार ३३१ रुपयाचा अवैध गुटखा वगैरेचा माल जप्त केल्याची माहीती या सूत्राकडून मिळाली . असुन तसेच संबंधीत अन्न प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिवनी येथील किराणा दुकानाला शील ठोकले.
मंगळवार रोजी शिवणी येथील व्यापारी रशीद खुर्शीद कुरेशी. राहणार शिवणी यांच्या दुकानावर धाड टाकले असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या प्रतिबंधित पदार्थ गुटखा पानमसाला ,सुगंधित तंबाखू , व सुगंधित सुपारी, मुसाफिर, राजनिवास ,सागर ,अनार तंबाखू, विमल पान मसाला, मिराज पानमसाला, जाफरानी , सुगंधित रायल जाफरानी जर्दा ,व अन्य पदार्थाची विक्री व साठवणूक ताब्यात बाळगून असल्याचे मिळून आल्या वरून फिर्यादीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. असून संबंधित माल हा इस्लापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पथक प्रमुख सतीश हाके यांनी दिली