नांदेड| ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत फरार आरोपीस अटक करण्याकरीता अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी व शाखा यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोस्टे वजिराबाद गुरन 49/1999 कलम 379 भादवि, मध्ये मध्ये पंचवीस वर्षा पासुन फरार असलेला व मा. न्यायालयाने जाहीरनामा काढलेला अट्टल आरोपी नामे भारत चितांमन सोळंके, वय 53 वर्षे रा लक्ष्मीनगर मालटेकडी रेल्वे स्टेशन जवळ ता. जि. नांदेड हा दिनांक 10.10.2024 रोजी 15.00 वा. चे सुमारास सेतु सुविधा केंद्र औद्योगीक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे सपोउपनि सुधीर भालचंद्र खोडवे, ने. अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांना थांबलेला दिसला.


सपोउपनि सुधीर भालचंद्र खोडवे हे अर्जित रजेवर असुन खाजगी कामा निमीत्त जात होते ते पुर्वी पोस्टे वजिराबाद गुन्हे शाध पथकात काम केलेले असल्याने त्यांच्याकडे सदर आरोपी बाबत शंका होती. त्यांनी तात्काळ पोस्टे शिवाजीनगर येथील वॉरंट तामील करणारे अंमलदार श्री शेटवाड व पोस्टे वजिराबाद चे पोहेकॉ देवीदास डोईजड यांना संपर्क साधुन सदर आरोपी फरार आहे किंवा नाही याची खात्री केली. पोस्टे वजिराबादचे डोईजड यांनी सदर आरोपी हा वजिराबादचे गुन्हयात पंचविस वर्षापासुन फरार असुन मा. न्यायालयाने त्याचे विरूध्द जाहीरनामा काढल्याचे सांगीतले.


तसेच सदर आरोपी बाबत अधीक माहीती घेतली असता पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन 261/2002 कलम 457. 380 भादवि, पोस्टे शिवाजीनगर गुरन 256/2002 कलम 379 भादवि मध्ये फरार असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ श्री संजय पवार, सपोनि अनै.मा.वा.प्र.कक्ष पो. अ. कार्यालय नांदेड यांना फोन करून अतीरिक्त मुनुष्यबळ मागवुन घेतले असता श्री संजय पवार यांनी वाहातुक शाखा वजिराबाद येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार श्रीनिवास दत्तात्रय रामोड, व केशव रामदास आवचार या दोघांना सोबत घेवुन तात्काळ


औद्योगीक वसाहत शिवाजीनगर येथे पोहचुन त्यास ताब्यात घेवुन पोस्टे वजिराबाद येथे हजर केले आहे. सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ. अश्विीनी जगताप, गृह पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संजय पवार, सपोउपनि सुधीर खोडवे, ने. अनै.मा.वा.प्र.कक्ष, पो. अ. का. नांदेड, तसेच शवाशा वजिराबाद चे श्रीनिवास दत्तात्रय रामोड, व केशव रामदास आवचार अंमलदार यांनी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.



