Accused arrested : पंचवीस वर्षापासुन फरार आरोपीस केले गजाआड -NNL
नांदेड| ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत फरार आरोपीस अटक करण्याकरीता अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी व शाखा यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोस्टे वजिराबाद गुरन 49/1999 कलम 379 भादवि, मध्ये मध्ये पंचवीस वर्षा पासुन फरार असलेला व मा. न्यायालयाने जाहीरनामा काढलेला अट्टल आरोपी नामे भारत चितांमन सोळंके, वय 53 वर्षे रा लक्ष्मीनगर मालटेकडी रेल्वे स्टेशन जवळ ता. जि. नांदेड हा दिनांक 10.10.2024 रोजी 15.00 वा. चे सुमारास सेतु सुविधा केंद्र औद्योगीक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे सपोउपनि सुधीर भालचंद्र खोडवे, ने. अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांना थांबलेला दिसला.
सपोउपनि सुधीर भालचंद्र खोडवे हे अर्जित रजेवर असुन खाजगी कामा निमीत्त जात होते ते पुर्वी पोस्टे वजिराबाद गुन्हे शाध पथकात काम केलेले असल्याने त्यांच्याकडे सदर आरोपी बाबत शं...
