Mla. Sreejaya Chavan : आ. श्रीजया चव्हाण यांचे पत्र आणि पोलीस अधीक्षकांचे ‘मिशन निर्भया’!

नांदेड| सजग लोकप्रतिनिधी आणि तत्पर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागातून व्यापक समाजहितासाठी प्रभावी संकल्पना कशा आखल्या जाऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण नांदेड पोलिसांच्या ‘मिशन निर्भया’ उपक्रमातून समोर आले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेविषयी जनजागृती मोहीम राबवण्याच्या मागणीसंदर्भात आ. श्रीजया चव्हाण यांनी लिहिलेल्या पत्राला अनुसरून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने ‘मिशन निर्भया’ हा उपक्रम आखला असून, पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुक्रवारी या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

‘मिशन निर्भया’च्या उपक्रमाचे स्वागत आणि पोलिसांच्या जनजागृती व्याख्यानांना श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीतून सुरुवात करण्याची सूचना मांडण्यासाठी आ. श्रीजया चव्हाण आणि सोसायटीचे सचिव तसेच माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षकांनी आ. श्रीजया चव्हाण यांच्या पत्रातूनच या उपक्रमाची संकल्पना उदयास आल्याचा उल्लेख केला.

इयत्ता आठवी ते दहावीच्या शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पोलीस विभागामार्फत व्याख्यानांचे आयोजन करण्याची मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी ९ मे २०२५ रोजी लिहिलेल्या पत्रात केली होती. या व्याख्यानांमधून कायद्याचे प्राथमिक ज्ञान, सार्वजनिक स्थळी घ्यावयाची काळजी, अनुचित प्रसंगांबाबत पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे महत्त्व, चांगला समाज घडवण्यात पोलिसांची भूमिका, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आणि विशेषतः मुलींना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे मार्ग याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे, असे त्यांनी सुचवले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होऊन गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

आजच्या भेटीत आ. श्रीजया चव्हाण आणि डी.पी. सावंत यांनी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे अभिनंदन केले आणि पोलिसांच्या व्याख्यानांची सुरुवात श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्थांमधून करण्याचा प्रस्ताव मांडला. पोलीस अधीक्षकांनी ही सूचना मान्य करत लवकरच याबाबत नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button