हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार | नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वे मदत (Rail Madad) ॲपच्या माध्यमातून दाखल तक्रारीनंतर पॉकेटमार चोराला पकडण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.


रेल्वे मदत ॲपवर प्राप्त माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 77615 ने नांदेड ते हिमायतनगर दरम्यान प्रवास करणाऱ्या एका या प्रवाशाने तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराने सांगितले की, इंजिनच्या बाजूच्या कोचमध्ये एक पॉकेटमार चोर पकडण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच जीआरपी कंट्रोल, छत्रपती संभाजीनगर (CPSN) तसेच ऑन ड्युटी आरपीएफ कर्मचारी आणि मुदखेड येथील कॉन्स्टेबल श्री. एम. किशोर यांना तात्काळ सतर्क करण्यात आले. पुढील कारवाईसाठी जीआरपी व आरपीएफ यांच्या मदतीची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.


दरम्यान, तक्रारदाराने रेल्वे प्रशासनाच्या तत्काळ प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले असले, तरी “नांदेड रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांनी रोज गस्त घालावी, कारण चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत,” अशी मागणी शिवदास गिनेवाड यांनी केली आहे. ही घटना रेल्वे मदत ॲप प्रवाशांसाठी किती उपयुक्त आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित करते.


