क्राईमनांदेड

Jewellery thift arested : ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

देगलूर/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सचे दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांना मरखेल पोलिसांनी थरारक पाठलागानंतर जेरबंद केले. या कारवाईत साडेसात लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून एकास अटक करण्यात आली आहे.

ही घटना ३१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३ ते ३.२५ वाजेदरम्यान हाणेगाव (ता. देगलूर) येथील मुख्य सराफा मार्केटमध्ये घडली. याप्रकरणी पोलीस ठाणे मरखेल येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०९/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रगस्तीत चोरटे रंगेहात सापडले
पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात रात्रगस्तीचे कडक नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक ३० ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, पो.कॉ. रफिक सय्यद, पो.कॉ. नारायण यंगाले व चालक पो.कॉ. यादव सोनकांबळे हे रात्रगस्त करीत असताना हाणेगाव येथे आले.

Oplus_16908288

रात्रगस्ती दरम्यान क्यूआर कोड स्कॅन करत असताना ‘आध्यारे ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर अर्धवट उघडे असून समोर एक इसम संशयास्पदरीत्या रेकी करत असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिस वाहन पाहताच दुकानातील दोन चोरटे सोन्या-चांदीचे दागिने पांढऱ्या पोत्यात भरून पळ काढू लागले.

जीवाची पर्वा न करता पाठलाग
अंधारात झाडी-झुडपात पळणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग केला. यावेळी सेवकसिंग रघुसिंग तिलपत्ते (रा. उमरी, जि. नांदेड) यास ताब्यात घेण्यात यश आले. त्याच्या ताब्यातून
चांदीचे दागिने – २ किलो ६०० ग्रॅम (₹७,००,०००) रोख रक्कम – ₹३०,७९० एक ग्रॅम सोन्याचे १२ मणी – ₹१५,००० असा एकूण ₹७,४५,७९०/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

इतर आरोपींचा शोध सुरू
पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने आपल्या इतर दोन साथीदारांची नावे व संपूर्ण चोरीचे नियोजन उघड केले. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली असून, आरोपीकडून इतर गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पो.उपनि. विलास पवार करीत आहेत. न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षीस
या धाडसी व उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अविनाश कुमार यांनी संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रत्येकी ₹१०,००० प्रमाणे एकूण ₹५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करत अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button