बिलोली/नांदेड| गेल्या नऊ दिवसापुर्वी घडलेल्या चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस अटक करून गुन्हयातील गेलेला माल हस्तगत करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नांदेड श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोनि अतुल भोसले, पोस्टे बिलोली यांना दिले होते. त्यावरून तपासाची चक्रे गतिमान करत बिलोली पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस गजाआड केले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यातील फिर्यादी नामे अली अब्दुल रशीद चाऊस, वय 28 वर्षे, व्यवसाय किराणा दुकान रा. छोटी गल्ली बिलोली ता. बिलोली जि. नांदेड यांनी दिनांक 27 जुलै 2024 रोजी रात्री 21.30 वाजेच्या सुमारास तक्रार दिली की, फिर्यादीचे आईने महिला बचत गटाचे उचलुन आणलेले साठ हजार रूपये फिर्यादीने घराकडे जाऊन ठेवण्यासाठी त्याचे दुकानासमोरील स्कुटीच्या डिकीत ठेवले. आणि किराणा दुकान बंद करून परत घरी जाण्यासाठी निघाला असता डिकीतील 60,000/- रूपये हे कोणतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले.


अशी फिर्यादी दिल्यावरून पोस्टे बिलोली गुरन 174/2024 कलम 303 (2) भा.न्या.सं-2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच घटनेचा पुढील तपास कामी पोहेकों मारोती मुददेमवार यांचेकडे दिला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता तेथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेत होते. आरोपीचा शोध घेत असतांना संशयीत आरोपी नामे शेख इम्रान शेख सलीम, वय 21 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. इदगाह गल्ली बिलोली यास ताब्यात घेवुन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा मीच केला असुन गुन्हयातील चोरलेली रक्कम साठ हजार रूपये पंचासमक्ष काढुन दिली आहे. अशा प्रकारे बिलोली पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणुन चांगल कामगीरी केलेली आहे.


सदरची कामगीरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, अबीनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नादेड,खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, हानपुडे पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी बिलोली, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि शिंदे, पोउपनि दिलीप मुंडे, पोहेकॉ एम एस मुददेमवार, पोकॉ व्यंकट घोंगडे, यांनी अथक परिश्रम घेऊन चांगली कामगीरी केली आहे. त्याबद्दल वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



