नांदेड| भुषण जवाहर राठोड वय ३४ व्यवसाय नोकरी सहा. मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड वर्ग २ याना ९ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार हे गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे ऑफिस बॉय म्हणून कामास आहेत. सदर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल करण्यात आले होते. सदर फेल झालेल्या चालकांना पास करण्याचे मोबदल्यात आरोपीनी तक्रारदार यांचेकडे 10,000 हजार रुपये लाचेची मागणी केली अशी तक्रार यांनीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या समक्ष हजर राहून दिली होती.
सदर तक्रारीची आज दिनांक 25/07/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल झालेल्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना पास करण्याचे मोबदल्यात आरोपीस तक्रारदार यांचे कडून तडजोडीअंती पंचासमक्ष 9000/- रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपीवर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.