HomeBlogNitin Bhutada | जीन प्रेस संचालकांच्या उदारतेमुळे छत्रपतींचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा...

Nitin Bhutada | जीन प्रेस संचालकांच्या उदारतेमुळे छत्रपतींचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा – नितीन भुतडा – NNL

न्यायालय प्रविष्ट असलेल्या चार दुकानदारांसोबत तडजोड

उमरखेड, अरविंद ओझलवार| छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासंदर्भातील अडचण असलेल्या चार दुकानदारांना जीन प्रेस मधील कॉम्प्लेक्स मध्ये दुकाने देण्याचे ठरल्यामुळे त्या चार दुकानदारांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणी तडजोड झाली असल्याने जीन प्रेस संचालकांनी दाखवलेल्या उदारतेमुळे छत्रपतींच्या पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ऑगस्ट महिन्यात पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे जिल्हा समन्वय तथा जीन प्रेस कोअर कमिटीचे सदस्य नितीन भुतडा यांनी पत्र परिषदेत दिली .

छत्रपती शिवरायांचा बंदिस्त अश्वारूढ पुतळा मोकळा करून नियोजित जागेत उभारण्यात यावा यासाठी काल दि 22 जुलै शिवप्रेमींनी जन आंदोलन उभारले होते .नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी एका महिन्यात पुतळा उभारणीचे काम सुरू करू या आश्वासनावर सदर आंदोलन मागे घेण्यात आले .प्रशासनाने दिलेले आश्वासन हे दुकानदारांनी न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणात तडजोड केल्याने शक्य झाल्याने त्याबाबत झालेल्या घडामोडी बाबत आज दि 23 रोजी नितीन भुतडा यांचे लोटस निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती .

या पत्रकार परिषदेत जीन प्रेस मधील सत्यशोधक पॅनलचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर , आमदार नामदेव ससाने, जीन प्रेस चे अध्यक्ष शिवाजीराव माने , उपाध्यक्ष जितेंद्र पवार , मानद सचिव चितंगराव कदम , भीमराव पाटील चंद्रवंशी , भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार ,छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष समिती चे अध्यक्ष देविदास शहाणे विलासराव चव्हाण सुनील शहाणे अमोल नरवाडे उपस्थित होते .

यावेळी बोलताना नितीन भुतडा यांनी मागील तीन वर्षापासून अश्वारूढ पुतळ्या संदर्भात घडामोडी होत असून नगर परिषदेचे चार दुकानदारांनी दुकाने हटू नये यासाठी उमरखेड व पुसद न्यायालयात प्रकरण दाखल केले होते .सदर प्रकरण काही काळ चालले असते तर अद्यापही पुतळा उभारणीस अडचण निर्माण होत होती त्यामुळे जीन प्रेस च्या संचालकांनी उमरखेड शहरात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला गेला पाहिजे यासाठी सदर दुकानदारांना जीन प्रेस मधील सुरू होणाऱ्या पाचशे दुकानाच्या कॉम्प्लेक्स मध्ये दुकाने देण्याचे मान्य केले.

तोपर्यंत सदर दुकानदारांना महागाव रोडवरील न पच्या खुल्या जागेत टीन पत्राचे अस्थाई दुकाने टाकण्याची परवानगी दिल्यानंतर काल 22 जुलै रोजी सदर दुकानदारांनी कोर्टात दाखल केलेले प्रकरण वापस घेतले .त्यामुळे येत्या ऑगष्ट महिण्यात पुतळ्याचे भुमिपुजन करून ९० दिवसात छत्रपती राजांना विराजमान करणार असल्याचे सांगीतले .

पुतळा व स्ट्रक्चर साठी आलेला निधी विहीत कालावधीत काम पुर्ण झाले नसल्याने परत गेला असला तरी आमदार ससाने यांनी १ कोटी रुपयाची मागणी शासनाकडे केली असुन तो नाही आल्यास न प च्या फंडातुन पुतळ्यासाठी खर्च करून पुतळा उभारू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला . छत्रपतींचा पुतळा आमच्या कारकीर्दीत झाला नाही पाहीजे यासाठी प्रयत्न सुरू असुन प्रशासनाने संघर्ष करावा व त्यातुन काही अघटीत घडावे असा काही जणांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नाव न घेता विरोधकांवर केला . जे आज आरोप करीत आहेत त्यांची जेव्हा न प मध्ये सत्ता होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चौकाला नाव देणाऱ्यांनी त्याठीकाणी कॉम्लेक्स उभारतांना पुतळ्या साठी जागा का सोडली नाही असा प्रश्न त्यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न यशस्वी मार्गी लावण्यासाठी जे प्रयत्न होत आहे ते भुषावह असुन कोणत्याही परिस्थितीत छत्रपतींचा पुतळा उभा राहीला पाहिजे ही प्रमाणिक इच्छा असल्याने विरोधक असुनही पत्रपरिषदेत हजर असल्याचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगीतले .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments