किनवट, परमेश्वर पेशवे। इस्लापूर येथील कैवल्यधाम हे तनकटाने माखून गेलेले असताना या हिंदू स्मशानभूमी कडे चोहोबाजूने झाडे, झुडपे, बेशरम, दुर्गंधी माखलेली होती. या बाबीकडे ग्रामपंचायतचे थोडेसे दुर्लक्ष झाले म्हणावे लागेल पण सामाजिक बाधिलकी लक्षात घेऊन पळसपुरे बंधुनी या समशानभूमीतील घान स्वच्छ करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पळसपूरे यांनी पुढाकार घेतला व माणुसकीचे दर्शन घडवून दिले. जे. सी. बी. च्या सहाय्याने या हिंदू कैवल्यधामाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. दोन दिवसापूर्वी गावातील स्मशान भुमीत बाहेर गावची पाहुणे मंडळी अंत्यविधीसाठी आले होते. त्यांनी या ठिकाणची अस्वच्छता व दुर्गंधी पाहून फार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली.


या कैवल्यधामात जाणाऱ्या सदरील नाल्यावरील पूल माजी आ. जोगेंद्र कवाडे याच्या निधीतून केला गेला तर स्मशान भुमीसाठी रस्ता नसल्याने माजी आ. प्रदीपजी नाईक यांनी डांबरी रस्ता मंजुर केला. त्यांच्या स्थानिक निधीतून बसण्यासाठी सिमेंट खुर्ची दिल्या पण या भूमीची देखभाल दुरुस्ती स्थानिक लेवलच्या प्रशासनाने न केल्याने स्मशान भुमीकडे दुर्लक्ष झाले.असल्याने झाडे झुडपे वाढली डांबरीकरण रस्ता प्रसिद्ध घमादेवी मंदिरापर्यंत गेला देवी जवळ दोन्ही बाजुने डांबरी रस्ता असुन आता शनिदेव पर्यत करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत



माजी खा. हेमंत पाटील यांनी स्मशान सुशोभीकरण साठी पाच लक्ष रुपयांचा निधी दिला होता. पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे हा निधी या ठिकाणी वापरण्यात आला नाही. येथील निधी हा इतरत्र वळविण्यात आला. आ. भीमराव केराम यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील मतदार करत आहेत.



ही स्मशान भुमी गलीच्छ असल्याने बालाजी पळसपुरे यांनी स्वता स्वखर्चाने जे. सी. लावुन गुरूवारी झुडपे, बेसरम, पालव्या साप केल्या असुन त्यांनी स्मशान भुमीकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेवर दोन्ही बाजूने बेल, पिपळ, वड, लीबाची झाडे लावण्याचा संकल्प केला असुन सर्व झाडांची देखभाल एक झाड एक व्यक्ती करून प्रत्येक झाडाला जाळी लावून झाडाच्या जाळीळा ज्याचे त्याचे नाव देवुन झाडाचे संगोपन करायचे असे ठरवले असुन फक्त ग्रामसेवक, सरपंच यांनी दवडी देवुन दुर्गंधी करणाऱ्याला लगाम घालावा.

जेने करून स्वच्छता केलेले स्मशान भुमी गलीच्छ होऊ नये साफ सफई करताना सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे यांनी पाहणी केली असुन या ठिकाणी दोन लाख रुपयांचा निधी आहे. असे ते म्हणाले बालाजी पळसपुरे पाटील यांनी स्वखर्चाने स्वच्छ करते वेळेस स्मशान भुमीत त्याच्या समवेत बालाजी पेशवे,भारत भोयर, कैलास गावडे,शेख लतीफ, विकास माहुरकर, सुदर्शन पाटील, बाळु लासीनकर, संजय गोळेकर, गणेश जयस्वाल दिवसभर उपस्थित होते.


