नांदेड | भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र पर्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नांदेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शहरातील डॉक्टरलाईन येथील पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपाच्या माजी उपमहापौर डॉ. शीलाताई सुनील कदम, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ. सिंधुताई देशमुख, डॉ. दत्तात्रय कदम, माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर, लक्ष्मण भवरे, युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष स. मनबीरसिंघ ग्रंथी, विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गंगाधर महाजन, तसेच गुरुप्रितसिंघ ग्रंथी, अमित कांबळे, तरविंदसिंघ बडगुजरा, शेख रसूल, पाशा तांबोळी, राजेश सोनाळे, जसबिरसिंघ इंदल, गोविंदराव आबाजी, संभाजी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी स. मनबीरसिंघ ग्रंथी यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती, संविधान मूल्ये आणि संघटनात्मक एकतेचा संदेश देणारा ठरला.



