श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वाईबाजार आणि अतिदुर्गम भागात असलेल्या सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना 108 रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याने पिंटू पाटील वायफनिकर यांनी नांदेड येथे आमदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदन देऊन दि 15 रोजी केली असता लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन असे आश्वासन आ हेमंत पाटील यांनी पिंटू पाटील वायफनिकर यांना दिले


माहूर तालुक्यातील अनेक खेडी गावे, अतिदुर्गम भागात असून जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ते नसल्याने पावसाळ्यात अनेक गावकऱ्यांचे उपचार मिळवून घेण्यासाठी प्रचंड हाल झाले अनेक पदाधिकाऱ्यांना ज्या गावातून मतदान मिळाले नाही त्या गावात शासकीय सुविधा फिरकु ही देत नाहीत त्यामुळे गोरगरीब नागरिकांचे उपचारासाठी प्रचंड हाल होतात ही बाब हेरून पिंटू पाटील वायफनिकर यांनी नुकताच वायफनि येथे आशीर्वाद पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्व रोग निदान शिबिर घेऊन चष्म्याचे वाटप तथा रक्तदान शिबिर घेत जनसेवेचा वसा अविरत चालूच ठेवलेला असून अनेक रुग्णांना आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने यवतमाळ पुसद येथे नेऊन अनेकांचा जीव वाचवलेला आहे

वाई बाजार आणि सिंदखेड येथील आरोग्य व्यवस्था पाहता येथून रेफर होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये हृदयाघात सर्पदंश अपघात गरोदर माता सह इतर गंभीर आजारांचे रुग्ण खाजगी रुग्णवाहिका किंवा भाड्याने वाहन घेऊन यवतमाळ पुसद येथे जाऊन उपचार करून घेतात त्यामुळे त्यांना मानसिक व आर्थिक फटका बसत आहे नागरिकांना आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याने 108 रुग्णवाहिकेची मागणी नांदेड येथे जाऊन आ हेमंत पाटील यांचे भेट घेऊन निवेदन दिले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चीवटे उपस्थित होते.


यावेळी आ हेमंत पाटील एन एच एम च्या सचिव कादंबरी बेलखोडे यांनी आमदार हेमंत पाटील यांच्या मागणीवरून 25 रुग्णवाहिका मंजूर केल्याने त्या पैकी तात्काळ आपल्या मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होतील असे आश्वासन पिंटू पाटील यांना दिले


