श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मौजे लांजी बायपास वरून गेलेल्या टाकळी पडसा वडसा वाई बाजार रस्त्यावर मौजे पडसा गावातून गेलेल्या राज्य मार्गामुळे अपघाताची भीती निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी पडसा बायपासला मंजुरी घेतली होती या कामाचे कंत्राटही निघाले परंतु एका शेतकऱ्याच्या विनाकारण तक्रारीमुळे रस्त्याचे काम आडल्याने येथील उपसरपंच बाबाराव चौधरी यांचे सह गावकऱ्यांनी तात्काळ रस्ता चालू करावा अन्यथा दि 1 पासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे


माहूर तालुक्यातील पडसा हे गाव एकेकाळी मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेले होते या गावाला जाण्यासाठी लांजी फाट्यावरून राज्य मार्ग रस्ता असून वाईबाजार वरूनही येण्या जाण्यासाठी रस्ता आहे तसेच या गावावरून विदर्भातील राणी धानोरा सदोबा सावळी आर्णी यवतमाळ जाता येते परंतु सदरील रस्ता हा गावाच्या मधून गेलेलां असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात या ठिकाणी घडलेले आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी बायपास रस्त्याला मंजुरी घेतली होती परंतु या रस्त्यावर शेत नसलेल्या शेतकऱ्याने माझ्या शेतातून रस्ता टाकावा म्हणून विनाकारण कामाला अडचण निर्माण केल्याने गावकरी संतप्त झालेले आहेत


गेल्या तीन ते चार वर्षापासून गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी हात पाय जोडून विनंती करून सदरील बायपास रस्त्याला मंजुरी मिळवून घेतली त्यासाठी निधीही मंजूर झाला तसेच कंत्राटदारांनी कंत्राटही घेतले परंतु एका शेतकऱ्याच्या विनाकारण तक्रारीमुळे आज घडीला मोठी वाहने या रस्त्यावर सुरू झाल्याने अपघातात नागरिकांना जीव जाण्याची पाळी आलेली आहे त्यामुळे पडसाचे उपसरपंच बाबाराव लक्ष्मण चौधरी यांचे सह गणेश नामदेव कातले व इतर शेतकरी गावकऱ्यांनी दि 1 रोजी पर्यंत रस्ता सुरू न झाल्यास सदरील रस्त्यावरच आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संबंधितांना दिल्याने खळबळ उडाली असून संबंधित विभागाने शेतकऱ्याची समजूत काढून तात्काळ रस्ता सुरू करावा अशी मागणी वाहनधारकातूनही होत आहे




