नांदेड| मुदखेड शहराच्या अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.


शनिवारी दुपारी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला किशोर स्वामी, मुदखेडचे भाजप तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर, शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, माजी नगराध्यक्ष खुर्शिद शेठ, माजी उपनगराध्यक्ष माधव कदम, तालुका महामंत्री मारोती जाधव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये मोहम्मद खासीम, मोहम्मद खालेद, अब्दुल सत्तार, मोहम्मद हुसेन, मोहम्मद इम्रान, कुरेशी समाज संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद गौस, शेख समीर, उपाध्यक्ष मोहम्मद खासिम मोहम्मद हुसेन, मोहम्मद रियाज, मोहम्मद आवेश, मोहम्मद अरबाज, मोहम्मद अली आदींचा समावेश आहे.



