उस्माननगर l 22 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सजवलेल्या बैलांना पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत मारुती मंदिराजवळ आणून येथील मानकरी आनंदराव रावसाहेब पाटील घोरबांड, अशोक शंकरराव पाटील घोरबांड यांनी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ, फोडून गुलाल , मुरमुरे उधळून पोळा सणास सुरूवात करण्यात आली.
भारत हा आपला शेतीप्रधान देश म्हणून ओळख आहे. शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्त्व आहे बैला प्रति कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण पिठोरी अमोशाला साजरा केला जातो . बैलांना सजवून गावातील मारुती मंदिराच्या गोल फेरी मारून नंतर तोरण तोडण्यात येते.


श्रावण महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी इत्यादी सण आटोपलेली असताना , श्रावण महिन्यात शेवटी अमावस्येच्या दिवशी येतो तो सण म्हणजे सर्जा राजाचा पोळा या दिवशी बैलाचा थाट असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन दिले जाते . या दिवशी वर्षभर शेतात काम करणाऱ्या बैलांना शेतीच्या कामापासून सुट्टी दिली जाते. पोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधव आप आपल्या बैल बैलांना ओढा व नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून स्वच्छ आंघोळ करतात . या दिवशी बैलाच्या खांद्यांना हळदीने तेलाने शाम्पू लावून अंघोळ घालतात.. शेतकरी हा पौष्टिक आहार बैलांना देतात.


बैलाच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झूल अंगावर गेरूचे ठिपके , शिगांना कलर. बेगड लावतात , तसेच डोक्याला बाशिंग बांधले जाते गळ्यात कवड्या घुंगराच्या माळा नवी व्यसन नवीन कचरा पायाला करतो त्याचे थोडे घालतात आपली बैलजोडी इतर अपेक्षा आकर्षक व उठून दिसावी यासाठी शेतकरी बांधव बैल जोडीला सजवण्याचा खूप प्रयत्न करीत असतो सांसिंग करून गावातील सर्व बैल जोड्या वाजंत्री चेन्नई ढोल ताशा वाजवत एकत्र जमा होऊन मिरवणूक काढली जाते. गावचे मानकरी आनंदराव रावसाहेब पाटील घोरबांड, अशोक शंकरराव पाटील घोरबांड, राजू रावसाहेब पाटील घोरबांड, दत्ता पाटील घोरबांड , यांचा पोळ्याचा मान असतो.



आजच्या २१ व्या शतकात दिवसेंदिवस बदल होऊन नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नविन यंत्रणे बाजारात आल्याने शेतकरी जलदगतीने कामे करण्यासाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून कामे करण्यासाठी याकडे आकर्षित झाले असल्याने बळीराजाकडे बैल जोड्या कमी प्रमाणात दिसून येत आहेत.

उस्माननगर येथील घोरबांड परिवार व प्रतिष्ठित नागरिक सदरील मिरवणुकीत पुढं व मारोती मंदीराच्या फेऱ्या करण्यासाठी सर्वात अगोदर बैलाच्या मान असतो. वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करीत पाच फेऱ्या फिरवतात. नंतर त्यांच्या मागे गावचे सर्व बैल फिरतात. मागील अनेक वर्षांपासून उस्माननगर येथे भीषण पाणीटंचाई असल्याने शेतकरी बैलजोड्या ठेवणे टाळत होते.
पोळ्याच्या सकाळी मारुतीला शेंदूर वाजत गाजत नेऊन दोरीने तयार केलेले तोरण सुंभापासून दोरीने तयार करून ते बांधण्यात येते काळानुसार दुरी बदलत गेली बांधलेल्या दोरीचे तोरण तोडण्याचा मान येतील मानकरी आनंदराव पाटील घोरबांड, कै.व्यंकटराव पाटील घोरबाड यांच्या परिवारातील कुटुंबातील सदस्यांना आहे. या मानकरांकडून लांब काठीने धोरण तोडण्यास तोडल्या जाते त्यानंतर सर्व बैल जोडी शेतकरी आपापल्या घरी नेतात घरी बैलाच्या स्वागतासाठी सुहासिनी घरासमोर अंगणात सडा सारवन, रांगोळ्या काढून वाट बघतात .
यावेळी बैलांना ओवाळण्यात येते. त्यांना खायला पुरणपोळी व सुप्रसन्नचा नैवेद्य दिल्या जाते. वर्षभर बैलाची निगा राखणाऱ्या गड्याला नवीन कपडे देण्यात येतात अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला पारंपारिक पोळा उत्साहात साजरा झाला . यावेळी बीट जमादार कुबडे , पोलिस पाटील मोरे , वैजनाथ पाटील घोरबांड. गावातील महिला व पुरुष यांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

