Pola festival ; उस्माननगर परिसरात पोळा सण उत्साहात साजरा सर्जा राजाची संख्या दिवसेंदिवस कमी
उस्माननगर l 22 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सजवलेल्या बैलांना पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत मारुती मंदिराजवळ आणून येथील मानकरी आनंदराव रावसाहेब पाटील घोरबांड, अशोक शंकरराव पाटील घोरबांड यांनी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ, फोडून गुलाल , मुरमुरे उधळून पोळा सणास सुरूवात करण्यात आली.
भारत हा आपला शेतीप्रधान देश म्हणून ओळख आहे. शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्त्व आहे बैला प्रति कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण पिठोरी अमोशाला साजरा केला जातो . बैलांना सजवून गावातील मारुती मंदिराच्या गोल फेरी मारून नंतर तोरण तोडण्यात येते.
श्रावण महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी इत्यादी सण आटोपलेली असताना , श्रावण महिन्यात शेवटी अमावस्येच्या दिवशी येतो तो सण म्हणजे सर्जा राजाचा पोळा या दिवशी बैलाचा थाट असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन दिले जाते . या दि...
