नांदेड l गंगाखेड येथील संजय उत्तमराव चव्हाण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएच. डी. प्रदान करण्यात आली.


“Production and Characterization of Bioactive Compounds of Microbial Origin against Multi Drug Resistant Strains of Escherichia coli या विषयावर प्रा. टी.ए.कदम,जैवशाश्न संकुल, स्वा.रा. ती.म.विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शोधप्रबंध सादर केला.

श्री. संजय उत्तमराव चव्हाण यांनी CSIR-NET JRF, GATE आणि MH-SET अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले आहे, हे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधन क्षमतेचे द्योतक आहे. श्री. चव्हाण यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा.टी.ए.कदम, आपल्या कुटुंबीय, सहकारी,तसेच जैवशाश्नसंकुलातील शिक्षकवृंद व स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड प्रशासनाला दिले आहे.



