नवीन नांदेड l महावितरणकडून शहरात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेविरोधात वंचित बहुजन आघाडी, नांदेड महानगर (दक्षिण) तर्फे प्रतिनिधी मंडळाने अधीक्षक अभियंत्यास विरोध नोंदवत चेतावणीचं निवेदन देण्यात आले.


वीज कायदा 2003 च्या कलम 47(5) नुसार, कोणता मीटर वापरायचा हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकाला असून ग्राहकाच्या स्पष्ट संमतीशिवाय कोणताही मीटर बदलणे हा कायद्याचा भंग आहे. म्हणजेच स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची लेखी संमती घेऊनच मीटर बसवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.


सर्वात चिंताजनक बाब म्हणजे महावितरणचे कर्मचारी कोणतीही पूर्व लेखी परवानगी न घेता, जुने मीटर तोडत आहेत. त्यात टेम्परींगचा खोटा ठपका ठेवून कारवाईची भीती दाखवुन, पैशे उकळण्याचा धंदा सुरू आहे.


हा बेकायदेशीर प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी करत प्रशासनाला इशारा देण्यात आला की हा अन्यायकारक व जनविरोधी निर्णय मागे घेतला नाही, तर वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या हक्कासाठी तीव्र व आंदोलन उभं करेल असे निवेदनात नमूद केले असून .या वेळी प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, महासचिव श्याम कांबळे, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड,उपाध्यक्ष सादिक बाचोटीकर,अशोक मगरे, अब्दुस समी, एस. एम. भंडारे, ॲड. शेख बिलाल, अनिल बेरजे, महंमद कासीम, गौतम डुमने ,राजु जमदाडे, यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



