नवीन नांदेड| राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नांदेड दक्षिण जिल्ह्याच्या वतीने विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने करण्यात आले होते . या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे याच्या हस्ते करण्यात आले . या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले हे शिबिर म्हणजे समाजसेवेच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरले.


भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा वाढदिवस निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत महारक्तदान शिबिराचे आयोजन आज दि २२ रोजी विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस मध्ये करण्यात आले होते . या रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपाचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे ‚भाजपा जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे ‚कंधार पंचायत समितीचे माजी सभापती बालाजीराव पांडागळे, महानगर सरचिटणीस अमोल कदम‚ माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ कालिदास मोरे ‚दीपक कोठारी ‚ शंकर मनाळकर ,जयप्रकाश येवले ‚आशुतोष धर्माधिकारी‚ सदाशिव कल्याणकर ‚संतोष कदम जानपुरीकर, सुधीर हंबर्डे,अक्षय हंबर्डे यांची उपस्थिती होती . यावेळी या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले .यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना दिर्घआयुष्य लाभो अशी प्रार्थना उपस्थितांनी केली. आणि त्याच्या हाताने राज्यातील शेतकरी ‚कामगार ‚महिला‚युवक याच्यासाठी चांगल्या योजनाची निर्मिती होवुन येथील सर्वसामान्य नागरिक सुखी व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली .रक्तदान हेच जीवनदान या मंत्राने प्रेरित होऊन, हा सामाजिक उपक्रम संपूर्ण परिसरात प्रेरणादायी ठरला आहे.



रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहयोग एज्युकेशनल कॅम्पस येथील कॉलेज ऑफ एज्यूकेशनचे प्राचार्य डॉ बालाजी गिरगावकर, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. ईशान अग्रवाल व श्री. शिवानंद बारसे, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ विजय नावघरे, मॅनेजमेंट कॉलेजच्या संचालिका डॉ. गजाला खान, बी सी ए कॉलेजचे प्राचार्य सुनील हंबर्डे, मदर तेरेसा नर्सिंग स्कूलचे प्राचार्य श्री. सुनील पांचाळ, इंदिरा स्कूलचे प्राचार्य विक्रम ढोणे,प्राशसकीय अधिकारी विश्वनाथ स्वामी, इंदिरा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी च्या प्राचार्य डॉ भार्गवी,फार्मसी विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत जाधव, प्रा. राजेश क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी उत्साहाने सहभाग घेत रक्तदान करण्यात आले. शेवटी आयोजकांच्या वतीने डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी,नांदेड येथील रक्तपेढी तील कर्मचाऱ्यांचे व सर्व उपस्थितांचे, आभार मानण्यात आले.


