blood donation camp : भाजपाच्या तर्फे आयोजित रक्तदान शिबिर यशस्वी
नवीन नांदेड| राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नांदेड दक्षिण जिल्ह्याच्या वतीने विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने करण्यात आले होते . या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे याच्या हस्ते करण्यात आले . या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले हे शिबिर म्हणजे समाजसेवेच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा वाढदिवस निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत महारक्तदान शिबिराचे आयोजन आज दि २२ रोजी विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस मध्ये करण्यात आले होते . या रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपाचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ...
