नांदेड/नायगाव| कुंटुर पोलीस व महसुल विभाग यांनी मिळून चारवाडी फाट्याजवळ रोडवर अवैध रित्या काळी रेतीची चोरटी वाहतुक करणारा हायवा पकडुन एकुण 22 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे नायगांव, नरसी परिसरातील इलू माफियात खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी परिसरात होणाऱ्या अवैद्य रेती वाहतूक व चोरीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपेरशन प्लश आऊट अंतर्गत कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि.17/07/2025 रोजी सायंकाळी 4 वाजताचे सुमारास मंडळ अधिकारी रोहिदास पवार, तलाठी पांडुरंग हाके, पोउपनि सुनिल जाधव, पोहेकॉ. मोहन कंधारे हे अवैध रेतीची वाहतुक करणाऱ्या वाहनावर संयुक्त कार्यवाही करण्यासाठी रावण झाले होते.


दरम्यान कुंटुर ते कोकलेगाव जाणारे रोडवर चारवाडी फाट्याजवळ हायवा क्र. MH-26-BD-9109 चा चालक साईनाथ विठ्ठल मोरे वय 25 वर्ष रा. टाकळी ता. नायगांव जि. नांदेड व मालक प्रभाकर येदुराज जाधव रा. सातेगाव ता. नायगांव जि. नांदेड यांनी संगणमत करुन हायवा गाडी किमंत 22,00,000/- रु. मध्ये विना परवाना बेकायदेशीर रित्या काळी रेती 05 ब्रास प्रति ब्रास 6000/- रुपये असा एकुण किमंती 30,000/-रुपयाची (अक्षरी तिस हजार) रेती भरुन तिची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेवून जात असतांना आढळून आले. त्यावरून संबंधितांवर कार्यवाही करत एकुण 22,30,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन कुंटुर येथे गुन्हा दाखल करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.


नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफियांकडुन अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक संदर्भाने यशस्वीपणे कार्यवाही पार पाडणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अभिनंदन केले. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यावर भविष्यात अजुन कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.



