नांदेड| मनपा हद्दीत मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत दिपनगर येथील सुर्यवंशी यांचे घर ते जोशी यांच्या घरापर्यंत आणि हनुमान मंदिर कॉर्नर ते रविंद्र प्राथमिक शाळा पर्यंत सुरु असलेल्या सिमेंट कोक्रेट रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यांनी एका निवेदनद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


नांदेड शहरातील दीप नगर भागात होत असलेल्या सिमेंट कोक्रेट रस्त्याचे दोन कामे अंदाजपत्रकानुसार होत नसल्यामुळे मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत मंजूर निधीचा अपव्यय होतो आहे. शासनाच्या योजनेमार्फत सुरु असलेल्या कामाचे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम उरकून बिले काढण्याच्या तयारीत आहेत. रस्त्याचे काम करताना शासनाच्या मुलभूत सोयी-सुविधेला बगल दिली जात आहे.



त्यामुळे रस्ता कामाचा बोजारा उडाला असून, सदर कामाचे तिन-तेरा करुन शासनाच्या निधीचा गैरवापर केला जातो आहे. सामान्य नागरीकांच्या कराचा पैसा अशी काही मंडळी आपल्या महानगरपालिकेतील ज्युनिअर इंजिनीअर श्री. पाटील, तसेच उपकार्यकारी अभियंता श्री. दिलीप टाकळीकर यांच्या कृपा आशिर्वादाने मुजोर ठेकेदार बोगस कामे दाखवून बिले अदा करीत आहे.


अशा ठेकेदारांना अशी निष्कृष्ठ दर्जाची कामे रद्द करुन पुन्हा नव्याने नविन निविदा काढून, नविन ठेकेदारास देण्यात यावे. या काम करणाऱ्या ठेकेदारास काळया यादीमध्ये समाविष्ट करावे. संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही करुन अशा मुजोर अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. जो काही शासनाच्या निधीचा खर्च झाला तो संबंधित ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावे. असे न झाल्यास येत्या 02 ते 04 दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास त्या अधिकाऱ्या विरुध्द शिवसेना स्टॉईलने उत्तर देण्यात येईल असा ईशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यानी दिला आहे.



