Nanded ; नांदेड शहरातील दीपनगर भागातील सिमेंट कोक्रेट रस्ता बोगस
नांदेड| मनपा हद्दीत मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत दिपनगर येथील सुर्यवंशी यांचे घर ते जोशी यांच्या घरापर्यंत आणि हनुमान मंदिर कॉर्नर ते रविंद्र प्राथमिक शाळा पर्यंत सुरु असलेल्या सिमेंट कोक्रेट रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यांनी एका निवेदनद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
नांदेड शहरातील दीप नगर भागात होत असलेल्या सिमेंट कोक्रेट रस्त्याचे दोन कामे अंदाजपत्रकानुसार होत नसल्यामुळे मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत मंजूर निधीचा अपव्यय होतो आहे. शासनाच्या योजनेमार्फत सुरु असलेल्या कामाचे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम उरकून बिले काढण्याच्या तयारीत आहेत. रस्त्याचे काम करताना शासनाच्या मुलभूत सोयी-सुविधेला बगल दिली जात आहे.
त्यामुळे रस्ता कामाचा बोजारा उडाला असून, सदर कामाचे तिन-तेरा करुन शासनाच्या निधीचा गैरवापर केला जातो आहे. सामान्य नागरीकांच्...
