नांदेड l मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अभ्यास शिबीर चेंबूर (मुंबई) येथील आदर्श विद्यालयातील कॉम्रेड लहानू कोम सभागृहात मोठ्या उत्सहात संपन्न झाले. सुरवातीला पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहन आणि शहीद हुतात्म्यांना पुष्पांजली वाहण्यात आली.


या अभ्यास शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य माजी खासदार कॉ. निलोत्पल बसू, अ.भा.किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पॉलिट ब्युरो सदस्य कॉ.डॉ.अशोक ढवळे, माजी खासदार तथा राष्ट्रीय नेत्या कॉ.वृंदा करात आदींची प्रमुख उपस्थिती होती.


उपरोक्त शिबिरात एकूण सहा सत्र घेण्यात आले. स्वागत आणि प्रस्ताविक राज्य सचिव कॉ.डॉ.अजित नवले यांनी केले. कॉ. निलोत्पल बसू, कॉ.अशोक ढवळे, कॉ.वृंदा करात,कॉ.अजित अभ्यंकर, कॉ.डॉ.डी. एल.कराड यांनी वेगवेगळ्या विषयांवर सोप्या भाषेत मांडणी केली.


अध्यक्षीय मंडळामध्ये आमदार कॉ. विनोद निकोले,कॉ.विजय गाभणे,कॉ.यशवंत झाडे,प्रा.कॉ.सुभाष जाधव,कॉ.रेहाना शेख, कॉ.मारोती खंदारे आदी नेतेगन होते.

पक्षाचे काम असलेल्या २७ जिल्ह्यातील २१४ पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी या अभ्यास शिबिरात सहभाग घेतला. पॉलिट ब्युरो व राष्ट्रीय नेत्यांसमक्ष राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी राज्य कमिटीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष नूतनिकरण, जनसुरक्षा विध्येयक विरोधी स्वाक्षरी मोहीम व मुंबई आंदोलन,पॅलेस्टाईन एकता दिन, जातीय सलॊखा व लोकशाही रक्षण दिन, लग्न प्रश्न, ९ जुलै देशव्यापी औद्योगिक बंद व ग्रामीण महाराष्ट्र बंद, शाखा सचिवांचे अभ्यास शिबीर, निसर्ग संवर्धन दिन व शाखा सक्रियता दिन, १ ऑगस्ट कॉम्रेड अण्णा भाऊ साठे जयंती, ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असे भरगच्च कार्यक्रम व नवीन आव्हाने दिली.
वरिष्ठ पक्ष श्रेष्टीने दिलेली आव्हाने उपस्थितीत पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी आनंदाने स्वीकारित पूर्ण ताकतीने यशस्वी करण्याचा संकल्प केला. या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातून जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम यांच्या नेतृत्वाखाली ११ पूर्णवेळ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.हे अभ्यास शिबीर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बदल घडवून राज्यात माकपची वेगळी ताकत दाखवेल अशी राज्य कमिटीला अपेक्षा व विश्वास आहे.


