नांदेड,अनिल मादसवार| पिंपळगाव येथे असलेल्या श्री दत्त संस्थान परिसरात आगामी मार्च महिन्यातील दिनांक 6 ते 13 या सात दिवसाच्या काळात भव्य शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यात आपला सहभाग असावा या उद्देशाने हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दत्त संस्थानाला भेट देऊन तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे शॉल व पुष्पहाराने स्वागत करत आशीर्वाद घेत आपला खारीचा वाटा दिला आहे.


जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे असलेल्या श्री दत्त संस्थान परिसरात आगामी मार्च महिन्यातील दिनांक 6 ते 13 या सात दिवसाच्या काळात भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळगाव संस्थानचे परमपूज्य गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याची गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी सुरु आहे.

या कार्यक्रमाची माहिती मिळताच नं भूतो नं भविष्यती होणाऱ्या सत्संग सोहळ्याचे भागीदार होण्यासाठी हदगाव तालुक्यातील साप्ती गावच्या नागरिकांनी शनिवारी पिंपळगाव दत्त संस्थानाला भेट देऊन तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे शॉल व पुष्पहाराने स्वागत करत दर्शन व आशीर्वाद घेतले. या सोहळ्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी समजून आमच्या गावातील सर्व नागरिकांच्या वतीने खारीचा वाटा भेट म्हणून दिला असल्याचे सांगितले आहे.

या धार्मिक सोहळ्याच्या काळात संपूर्ण सात दिवस सेवाधारी म्हणून सहभागी होणार असल्याचा मानसही साप्ती गावच्या नागरिकांनी बोलून दाखवत सर्वानी या कुंभ काळात आयोजित भव्य शिवमहापुराण सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही केलं आहे. यावेळी साप्ती गावचे नागरिक उपस्थित होते.
