नवीन नांदेड l सिडको मोंढा भागातील सिमेंट रोड करणे, नळाला पाणी सोडण्याची कामे यासह इतर समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी मोढा प्रकल्प सिडको अंतर्गत असलेल्या दिव्यांग उपनिरीक्षक सुर्यभान कागणे यांच्या सह परिसरातील जवळपास शंभर नागरीकांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


दिलेल्या निवेदनात,राज अपार्टमेंट “ई” फ्लॅट क्रं 201 सिडको मोंढा नांदेड येथे, कुटूंबासह वास्तव्यास आहे. तसेच मी नांदेड पोलीस दलात पोलीस उप-निरीक्षक या पदावर पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे जनसंपर्क विभागात कर्तव्यावर आहे मी दिव्यांग असुन माझे जांगे पासुन दोन्ही पाय गंभीर अपघातात तुटले आहेत,अशा परिस्थीतीत मी व इतर दिव्यांग बांधव सिडको मोंढा येथुन दिव्यांगाच्या स्कुटीवर कर्तव्या करीता येणे जाणे करीत असतांत मनपा तर्फे सिडको मोढा भागातील संपूर्ण रस्ते खोदुन ड्रेनेज पाईप टाकण्यात आली आहेत.


परंतु सिमेंट रोड व नळ योजना चालु झाली नाही. रोड खोदल्यामुळे मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत तसेच ड्रनेजचे चेंबर उघडे पडलेले आहेत ड्रेनेज फुटल्यामुळे पाणी रस्त्यावर येवुन गाडया स्लीप होत आहेत त्यामुळे रात्री अपरात्री जात येत असतांना ड्रनेजच्या खड्यात पडुन एकादी प्राणहानी सारखी मोठी दुर्घटना घडू शकते, सिडको मोंढा भागातील सर्व रस्ते जाण्या येण्या सारखे राहीलेले नाहीत,पाऊस पडल्या नंतर संपूर्ण सिडको मोंढा भागात चिखलच चिखल होत असतो.


जो पर्यंत चिखल वाळत नाही तो पर्यंत वाहाने घेऊन जाता येत नाही. तसेच नालंदा इंग्लीश हायस्कूल असुन प्ले ग्रुप ते दहावी पर्यंत चे विद्यार्थी येत असतात पाऊस पडल्यानंतर लहान लहान मोठी मुलं यांना चिखलातुन चालता सुध्दा येत नाही येणाऱ्याना येता येत नाही रस्ते व्यवस्थीत नसल्यामुळे दळण वळणाची खुप मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

सिडको मोंढा भागातील सर्व जनतेची रहिवाशा साठी खुप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तसेच या भागात पाईप लाईन झालेली आहे परंतु अद्याप नळाला पाणी सोडण्याची व्यवस्था झालेली नाही. महानगर पालीकेकडून नळाला पाणी नाही, रस्ते बरोबर नाहीत आणि नळ पट्टी, घर पट्टी याचे बिले मात्र नियमीत येत आहे.
आ.आनंदराव पाटील बोढारकर यांनी सध्या सिडको मोंढा भागातील संपुर्ण सिमेंट रस्ते व नळाला पाणी सोडणे ही कामे लवकरात लवकर होणे करीता आपण आपल्या स्तरावर शासनास पत्रव्यवहार करुन आम्हा सर्व रहिवाश्या करीता सुविधा पुरवून आमच्या समस्या कायमस्वरुपी दुर कराव्यात,सिडको मोंढा भागात कांही रस्ते सिमेंट रोड झालेले आहेत.
परंतु आणखी 80% काम राहीलेले आहे. याकडे तात्काळ लक्ष देणे अत्यंत जरुरीचे आहे,या भागात दिव्यांग अधीकारी, कर्मचारी, तसेच इतर दिव्यांग व्यक्ती सुध्दा राहात असतात. पाऊस पडल्यास दिव्यांग व्यक्तांना अतिशय तातडीच्या प्रसंगी दवाखाण्यात उपचाराकरीता सुध्दा जात येत नाही.
आता कांही दिवसात उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळयात जमीनीतील पाणी पातळी कमी होत असते अशा वेळी हातपंपाला पाणी येत नाही पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आमच्या सारख्या दिव्यांग व्यक्तीची खुप मोठी अडचण निर्माण होत आहे.
म्हणुन दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आ.आनंदराव पाटील बोढारकर व मनपा आयुक्त आपण सिडको मोढा भागातील सर्व समस्या सोडविण्या करीता शासनास पत्रव्यवहार करावा व आमच्या समस्या सोडवाव्यात सिमेंट रस्ते बनविणे आणि नळाला पाणी सोडणे या समस्या लवकर सोडवाव्यात अशी मागणी दिव्यांग सुर्यभान दिगांबरराव कागणे, यांच्या सह परिसरातील जवळपास अनेकांनी आयुक्त मनपा यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.


