CIDCO ; सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, मलनिस्सारण, पाणी समस्या, तात्काळ सोडविण्याची नागरीकाची मागणी
नवीन नांदेड l सिडको मोंढा भागातील सिमेंट रोड करणे, नळाला पाणी सोडण्याची कामे यासह इतर समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी मोढा प्रकल्प सिडको अंतर्गत असलेल्या दिव्यांग उपनिरीक्षक सुर्यभान कागणे यांच्या सह परिसरातील जवळपास शंभर नागरीकांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात,राज अपार्टमेंट "ई" फ्लॅट क्रं 201 सिडको मोंढा नांदेड येथे, कुटूंबासह वास्तव्यास आहे. तसेच मी नांदेड पोलीस दलात पोलीस उप-निरीक्षक या पदावर पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे जनसंपर्क विभागात कर्तव्यावर आहे मी दिव्यांग असुन माझे जांगे पासुन दोन्ही पाय गंभीर अपघातात तुटले आहेत,अशा परिस्थीतीत मी व इतर दिव्यांग बांधव सिडको मोंढा येथुन दिव्यांगाच्या स्कुटीवर कर्तव्या करीता येणे जाणे करीत असतांत मनपा तर्फे सि...
