Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
Home - नांदेड - Global Adgaon : ग्लोबल आडगावला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराची चार नामांकने
नांदेड

Global Adgaon : ग्लोबल आडगावला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराची चार नामांकने

अनिलकुमार साळवे यांना उत्कृष्ट कथेसाठी नामांकन
NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 2025Updated:February 1, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Global Adgaon received four nominations for Maharashtra State Film Awards
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Post Views : 235

नांदेड| मराठवाड्यातील ग्रामीण संस्कृती, शेती आणि ग्लोबलायझेशनच्या प्रभावावर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित ‘ग्लोबल आडगाव’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये चार नामांकने मिळवत मोठे यश मिळवले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी साठाव्या राज्य चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली असून, या चित्रपटाने विविध नामांकने पटकावली आहेत.

चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी नामांकन मिळाले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट गीते (प्रशांत मडपुवार – यल्गार होऊ दे) आणि उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता (रोनक लांडगे) या विभागांत देखील ‘ग्लोबल आडगाव’ने स्थान मिळवले आहे.

मनोज कदम (निर्माता) आणि अमृत मराठे (सह-निर्माता) यांनी साकारलेल्या या चित्रपटाने याआधीच न्यू जर्सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल (अमेरिका), न्यूलीन लंडन बेस्ट रायटर अवॉर्ड, इफ्फी गोवा महोत्सव, कोलकाता फिल्म फेस्टिव्हल, अजंता-एलोरा फिल्म फेस्टिव्हल, पीफ फेस्टिव्हल, यशवंत फेस्टिव्हल अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवांमध्ये आपली चमक दाखवली आहे.

चित्रपटात सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, रौनक लांडगे, सिद्धी काळे, अशोक कानगुडे, अनिल राठोड, महेंद्र खिल्लारे, साहेबराव पाटील, डॉ. संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसह 665 हून अधिक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. डॉ. विनायक पवार, प्रशांत मडपुवार आणि डॉ. अनिलकुमार साळवे यांनी गीतलेखन केले असून, जसराज जोशी, डॉ. गणेश चंदनशिवे आणि आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत. संगीतकार विजय गावंडे, सिनेमॅटोग्राफर गिरीश जांभळीकर, संकलन श्रीकांत चौधरी, निर्मिती व्यवस्थापक प्रशांत जठार, सागर पतंगे, कला दिग्दर्शन संदीप इनामके, तसेच गणेश नारायण आणि डॉ. सिद्धार्थ तायडे (सह-दिग्दर्शक) यांनी चित्रपटाची तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळली आहे.

ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली कोलमडणारी शेती यासारख्या गंभीर विषयांना स्पर्श करणारा ‘ग्लोबल आडगाव’ एप्रिल-मे 2025 मध्ये महाराष्ट्रासह अमेरिका, दुबई आणि अन्य ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने राज्य पुरस्कार नामांकन मिळवल्याने संपूर्ण मराठवाड्यात आनंदाचे वातावरण असून, ‘ग्लोबल आडगाव’ रुपेरी पडद्यावर कसा झळकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

for Maharashtra State Film Awards Global Adgaon received four nominations
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Posts

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या
नांदेड

नेत्यांच निवडणूका लागतात…तर कार्यकर्त्यांच्या निवडणूकीला इतका उशीर का…? कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल -NNL

July 1, 2024

Bullockpola festival is a big celebration : हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या साजरा; ढोल ताशाच्या गजरात काढली मानाच्या बैलजोडीची मिरवणूक -NNL

September 3, 2024

Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

August 3, 2024

Shri Renukadevi Sansthan ; श्री रेणुकादेवी संस्थान तर्फे वृद्धाश्रमातील महिला, पुरुषांना चादर,सतरंजी व इतर साहित्यांचे वाटप

January 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या
नांदेड

Dilip Gawde : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

नांदेड

Usmannagar Police : उस्माननगर पोलीसांनी यात्रेत हरवलेल्या दोन वर्षाचे चिमुकलीची व तिच्या आईची घडवुन आणली भेट

करियर

Spontaneous response : नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद- अ.वा. सूर्यवंशी

नांदेड

बाबुराव कदम कोहळीकर विधानसभेच्या दुसऱ्या ईनिंग करिता तयार; सहानुभूतीची लाट यावेळी तारणार..? -NNL

क्राईम

seized 3 kg 88 grams of ganja : विमानतळ पोलीस पथकाने छापा टाकून आरोपीसह 3 किलो 88 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.