Homeकरियरimplement innovative nutrition : नाविन्यपूर्ण पोषण आहाराची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांचे बिल...

implement innovative nutrition : नाविन्यपूर्ण पोषण आहाराची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांचे बिल थांबवण्यात येणार

नांदेड| प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत राज्यातील शासकीय व शासन अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून अंडी व केळी समाविष्ट करण्याचा (implement innovative nutrition) शासन निर्णय आहे. अशा प्रकारचा आहार न देणा-या शाळांचे बिल थांबण्‍याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

नांदेड जिल्ह्यातील शाळांना आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव अथवा अंडा बिर्याणी यासारख्या स्वरूपात अंडी पुरवण्याच्या सूचना आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्‍यांना अतिरिक्त पूरक आहार म्हणून केळी अथवा स्‍थानिक फळ देण्‍याचे निर्देश आहेत. हा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना हा नाविन्यपूर्ण आहार पुरवला जातो की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. ज्या शाळांनी विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी दिल्या आहेत, त्यांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपलोड करणे अनिवार्य आहे. ज्या शाळांनी हे फोटो अपलोड केले नाहीत किंवा या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी न केलेल्‍या शाळांचे मागील सहा महिन्यांचे शालेय पोषण आहार निधी बिल काढण्यात येणार नाही, असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले.

अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट यांचा समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पोषण सुधारून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. – मीनल करनवाल, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments