Homeनांदेडdistrict level training completed : हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए )...

district level training completed : हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संपन्न

नांदेड| सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) नांदेड (district level training completed) जिल्ह्यातील भोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली, देगलूर या दहा तालुक्यात दि.10 फेब्रुवारी 2025 ते दि. 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने आज दि. 24 जानेवारी 2025 रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे मा डॉ संगीता देशमुख मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मा.डॉ.निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार व मा. डॉ राजेश्वर माचेवार साहेब जिल्हा हिवताप अधिकारी तथा हत्तीरोग अधिकारी नांदेड यांच्या नियोजनानुसार नांदेड जिल्ह्यातील वरील तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्तरीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप), आरोग्य निरीक्षक हिवताप, हत्तीरोग यांची कार्यशाळा घेण्यात आली.

IMG 20250124 WA0047 district level training completed : हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संपन्न

जागतिक आरोग्य संघटनेचे मा.डॉ समाधान देबाजे साहेब यांनी नांदेड जिल्ह्यात एमडीए मोहीम सन 2024 मध्ये राबविण्यात आली त्या पीपीटी द्वारे सविस्तर माहिती दिली तसेच या वर्षी मोहीम प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थी यांना वयोगटानुसार डीईसी गोळ्या व अल्बेडाझोल गोळयाची एक मात्रा प्रत्यक्ष खाऊ घालण्यात यावी व मोहीम यशस्वी करावी असे सांगितले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे संतोष भोसले, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी रेणुका दराडे मॅडम, नांदेड जिल्हा हिवताप कार्यालय येथील संजय भोसले, माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, रवि तेलेंगे, अजित कोटूरवार, परमेश्वर मठदेवरु, चटलावार, खलील, दुधमल, नारळे, गवळी, निमकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments