HomeनांदेडBabhulgaon ; किंवळा पाणी साठवण तलाव‌ परिसरातून बाभुळगाव येथील शेतकऱ्यांना रस्ता व...

Babhulgaon ; किंवळा पाणी साठवण तलाव‌ परिसरातून बाभुळगाव येथील शेतकऱ्यांना रस्ता व विज पुरवठा करा – NNL

नवीन नांदेड l किवळा‌ येथील पाणी साठवण तलाव लगत असलेल्या बाभुळगाव येथील शेतकऱ्यांना पाणी साठवण तलावातून शेती साठी विघुत लाईट ,रस्ता तयार करून द्यावी व शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्याची मागणी सरपंच पुंडलिक मस्के यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून केली.

31डिसेबंर रोजी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत,मनपा आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे, पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी किंवळा पाणी साठवण तलाव भेट देऊन पाहणी केली व‌ चर्चा केली.

या प्रतिष्ठित नागरिक चक्रधर पाटील मोरे, माजी चेअरमन प्रभाकर पाटील मोरे, बालाजी पाटील मस्के, भगवान मस्के,काळेश्वर मस्के, व ग्रामस्थ यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व‌ तलाव‌ परिसरातून ‌शेतकरी बांधवांना पाणी पुरवठा साठी विद्युत लाईट व्यवस्था करून देण्यात यावी,यासह अन्य मागण्यांबाबत चर्चा केली, प्रारंभी जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी समस्या ऐकुण शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्या संदर्भात आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले, यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments