नांदेड। महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तीरोग लातूर विभागातील विविध प्रलंबित मागण्या बाबत पुणे येथे मा. डॉ. बबीता कमलापूरकर मॅडम, सह संचालक, आरोग्य सेवा ( हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग ) पुणे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. प्रथम माननीय मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आरोग्य सहाय्य्क, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांचे बऱ्याच दिवसा पासून प्रलंबित असलेले आश्वासीत प्रगती योजना 10,20,30 वर्ष लाभ देय बाबत, नवीन लोकसंख्येनुसार आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांची पदस्थापना बाबत प्रस्ताव सादर करावा या व इतर विविध बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी व नांदेड जिल्हाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकटेश पुलकंठवार, नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किरण कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.