नांदेड| हदगांव तालुक्यातील तामसा येथे पुरुष नसबंदी व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले असून, यास प्रतिसाद देणाऱ्यांचा आरोग्य विभागाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख मॅडम तसेच तालुका आरोग्य अधिकारी हदगांव डॉ. संजय मुरमुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 18 /12 /2024 रोजी प्रा. आ .केंद्र तामसा येथे एक पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया व सहा महिलावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सर्जन डॉ. साहेबराव भिसे सर यांनी यशस्वीरित्या केले आहे.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ. संजय मुरमुरे सर यांच्या हस्ते जांभळा येथील दोन मुलीं झाल्यानंतर पुरुष नसबंदी करवून घेणारे लाभार्थीचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मत परिवर्तन करणारे जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत नवनियुक्त आरोग्य सेवक श्री संतोष सानप यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मत परिवर्तन करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या आशा वर्कर श्रीमती धूर्पता खोकले यांचा पण अभिनंदन करण्यात आला व उपस्थित सर्व कर्मचारी व नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड व डॉ. मोहिनी सूर्यवंशी आणि आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम सर तसेच तामसा येथील आरोग्य कर्मचारी श्री रामेश्वर चिभडे, श्री प्रताप दुधमल, श्रीमती मंगल हळदे , श्री मारुती चव्हाण, श्री बाबासाहेब बिडकर आदी कर्मचारी उपस्थित होते.