किनवट, माधव सूर्यवंशी। गोकुंदातील स्व.बाळासाहेब ठाकरे चौकात रोडरोमिओंचा उद्रेक वाढल्याने विद्यार्थींनींना शाळा, महाविद्यालय आणि कोचींग क्लासेसमध्ये पाठवायचे की नाही ? असा संतप्त सवाल ऐकायला मिळू लागला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयापासून ते स्व.बाळासाहेब ठाकरे चौकापर्यंत पोलीस यंत्रणा दिल्याशिवाय रोडरोमिओंच्या उद्रेकाचा बिमोड होणार नाही. पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी किनवट पोलीसात त्या त्यावेळी तक्रारी दिल्या परंतू विद्यार्थीनींना भयमुक्त वातावरण मिळालेले नाही. आता शेवटी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्ठमंडळ जाणार असल्याचे वृत्त समजते.
गोकुंदातील स्व.बाळासाहेब ठाकरे चौकात छुप्पा दारुअड्डा आणि चालता फिरता मटका किंगाचा व्यवसाय तेजीत चालत असला तरी त्यावर कोणाचे कांहीच म्हणने नाही. परंतू स्व.बाळासाहेब ठाकरे चौकात कोचिंग क्लासेससाठी सकाळपासून रात्री नऊ वाजपर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थींनी अध्ययनासाठी असतात. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. शाळा भरणे व सुटण्याच्यावेळी रेल्वेगेट पासून ते स्व.बाळासाहेब ठाकरे चौकापर्यंत रोडरोमिओंचा हैदोस चालतो. उघड्या डोळ्यांनी तमाम जनता त्या गुंडप्रवृतीच्या रोडरोमिओंना पहाण्यापेक्षा कांहीच करु शकत नसल्याचे ऐकायला मिळाले.
फक्त पोलीस नसल्यामुळे याच चौकात अधून मधून हाणामार्यांचे प्रकार घडतात हे सर्वश्रूत आणि पोलीसांना ज्ञात असेलच. पालक ईज्जतीपोटी पोलीसांकडे तक्रार करत नाही निमुटपणे सहन करतो. अनेक पालकांनी विद्यार्थीनींना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवणे बंद केल्याचे ऐकायला मिळतेय. आता हे असह्य होत असल्याने शेवटी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे शिष्ठमंडळ जात असल्याचे सांगण्यात आले.
Post Views: 66