नांदेड | येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांनी लिहिलेल्या ‘हे बंध समाजनिष्ठेचे’ या पुस्तकाचे प्रकाशन दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी मंगळवारी होणार आहे. या प्रकाशन समारोहास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, नांदेड जिल्ह्याचे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे आणि साहित्यिक देवीदास फुलारी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांनी आजवरची केलेली समाजनिष्ठ वाटचाल, अनेकांना सोबत घेत उभी केलेली विविध स्वयंसेवी कामे आणि केलेला प्रामाणिक प्रयत्न हे सर्व शब्दबद्ध असलेल्या ‘हे बंध समाजनिष्ठेचे’ या पुस्तकाचा प्रकाशन समारोह दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड येथील कुसुम सभागृहात होणार आहे. या समारोहाचे अध्यक्षस्थान अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (भा. प्र. से.) हे भूषविणार आहेत तर माजी पोलीस अधीक्षक व निवृत्त ए.जी.डी. महाराष्ट्र व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे आणि साहित्यिक देवीदास फुलारी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी प्रकाशन समारोहास सर्व समाजसेवी, साहित्यिक व ग्रंथप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे आणि डॉ. सुप्रिया व डॉ. निकेत, सौ. नेहा व डॉ. निखिल पाटोदेकर यांनी केले आहे.