नवीन नांदेड l आफ्रिका खंडातल्या मालवी या देशातील आरोग्य तपासणी आणि शल्यचिकित्सा शिबिरात नांदेडचे सुपुत्र डॉ. प्रदीप नानासाहेब जाधव यांनी उल्लेखनीय योगदान दिले.


मालवी या देशातील ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरांमध्ये तेथील प्रसिद्ध एल एम जे हॉस्पिटलच्या वतीने कार्डिओलॉजी अँड सर्जरी त्यांचे आयोजन करण्यात आले याच्या मध्ये पुणे येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप जाधव यांनी पोट विकाराच्या विविध १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ प्रदीप जाधव पुण्यातील रेझूलेट केअर, मणिपाल हॉस्पिटल (खराडी पुणे), नोबल हॉस्पिटल (हडपसर) आणि मेडिकेअर हॉस्पिटल (हडपसर) येथे रुग्णसेवेत कार्यरत आहेत. आफ्रिका खंडातील मालवी या देशात ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरात गेल्या ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या.


या संदर्भात अधिक माहिती देताना सुप्रसिद्ध श्रेय चिकित्सक डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले की, शस्त्रक्रिया संदर्भातील तंत्रज्ञानाच्या आदान -प्रदान अंतर्गत आफ्रिकेत कार्डिओलॉजी आणि जनरल सर्जरीसाठी कॅम्पेन राबवण्यात आले. एल एम जी या १०० खाटांच्या रुग्णालयात जनरल सर्जरी आणि लॅप्रोस्कोपीच्या रुग्णांवर त्यांनी यावेळी शस्त्रक्रिया केली. एकूण सात दिवसांच्या या दौऱ्यात २३२ रुग्णांची यावेळी ओपीडी करण्यात आली. त्यात हर्निया, पाइल्स, अपेंडिक्स आणि इतर पोट विकारांची शर्यचिकित्सा करण्यात आली.


मालवी शहरातल्या स्थानिक रुग्णांसाठी हे आरोग्य शिबीर राबविण्यात आले. पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शल्यचिकित्से संदर्भातील तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता असेही यावेळी डॉ. प्रदीप जाधव यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.



