Monday, June 29

Tag: Dr. Nanded’s son in surgery at the international level. Incomparable contribution of Pradeep Jadhav.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शल्यचिकित्सेत नांदेडचे सुपुत्र डॉ. प्रदीप जाधव यांचे अतुलनीय योगदान – NNL

आंतरराष्ट्रीय स्तरावर शल्यचिकित्सेत नांदेडचे सुपुत्र डॉ. प्रदीप जाधव यांचे अतुलनीय योगदान – NNL

नांदेड, आरोग्य
 नवीन नांदेड l आफ्रिका खंडातल्या मालवी या देशातील आरोग्य तपासणी आणि शल्यचिकित्सा शिबिरात नांदेडचे सुपुत्र डॉ. प्रदीप नानासाहेब जाधव यांनी उल्लेखनीय योगदान दिले. मालवी या देशातील ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरांमध्ये तेथील प्रसिद्ध एल एम जे हॉस्पिटलच्या वतीने कार्डिओलॉजी अँड सर्जरी त्यांचे आयोजन करण्यात आले याच्या मध्ये पुणे येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप जाधव यांनी पोट विकाराच्या विविध १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ प्रदीप जाधव पुण्यातील रेझूलेट केअर, मणिपाल हॉस्पिटल (खराडी पुणे), नोबल हॉस्पिटल (हडपसर) आणि मेडिकेअर हॉस्पिटल (हडपसर) येथे रुग्णसेवेत कार्यरत आहेत. आफ्रिका खंडातील मालवी या देशात ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरात गेल्या ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. या संदर्भात अधिक माहिती देताना सुप्रसिद्ध श्रेय चिकित्सक डॉ. प...
error: Content is protected !!