नांदेड| भगावन बुद्धानी पंचवर्गीय भिक्खुना धम्म उपदेश देत प्रथम धम्म चक्र प्रवर्तन केले. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अर्थात अशोक विजया दशमी दिनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला येणाऱ्या अशोक विजया दशमीदिनी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नांदेडवासीयांतर्फे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक ७ वा महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ठिकाणी प्रमुख भदंत विनयबोधी थेरो, भंदत पंय्यारत्न थेरो,भंन्ते अश्वजीत थेरो,भंन्ते शिलरत्न थेरो ,भंन्ते बुध्दभुषन,भंन्ते पय्यवंर्धन हिंगोली,भिक्षुणी चारुशीला थेरीया ची उपस्थित राहून वंदना देणार आहेत. अडीच हजार वर्षांचा दैदीप्यमान असा ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चलवळींचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय चळवळ असो किंवा धम्म परिषदांची सुरुवात असो, नांदेड शहराने नेहमीच दिशा दर्शकाचे काम केले आहे.
६८ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनी प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर महाबुद्धवंदनेद्वारे सामूहिक अभिवादन करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. आयोजित महाबुध्द वंदनेला रोजी सकाळी ठिक ७ वा शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे असे आवाहन सर्व बौध्द उपासक उपसिकानी केले आहे.