भोकर। मौजे रहाटी तालुका भोकर येथील रहिवासी देविदास मल्लांना दोंतलोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत एसबीआय शाखा मातुळ येथील बँकेकडून अर्थसहाय्य म्हणून दोन लाखाचा चेक देण्यात आला.
तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले राहाटी ह्या गावचे देविदास मल्लांना दोंतलोड यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काही महिन्यापूर्वी मृत्यू झाल्याने घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची पॉलिसी घेतली होती त्यामुळे मातुळ एसबीआय शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश मुळे यांनी त्यांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितले, त्यांचा मुलगा महेश यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूची व सदरील विम्याची सर्व कागदपत्रे बँकेमध्ये जमा करून विमा कंपनीकडून त्यांना अर्थसहाय्य मिळवून दिले.
त्यात फिल्ड ऑफिसर तुषार पाली व्यवस्थापक अतुल बोंद्रे यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी दोन लाख रुपयाचा चेक मायाताची पत्नी लक्ष्मीबाई दोंतुलोड यांच्या स्वाधीन केला यावेळी शाखा व्यवस्थापकानी आपल्या सर्व बँक ग्राहकांना अशा प्रकारे होणाऱ्या दुर्घटनेतून कुटुंबाना मिळणारे अर्थसहाय्य योजनेची माहिती सांगून प्रत्येकाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना चा लाभ घेण्याचे आवाहन केले.