नांदेडलाइफस्टाइल

Art of living ; कौठा, हदगांव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आनंद अनुभुती शिबिर संपन्न -NNL

हदगाव। श्री श्री रविशंकरजी प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड तर्फै कौठा येथे शिव पार्वती मंगल कार्यालय मध्ये दि.20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान ग्रामीण अनुभुती शिबिर आनंद व उत्साहात आज संपन्न झाले ज्या साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यांनी अनुभव व अनुभुती पण छान सांगितली.

आरोग्य व अध्यात्मिक प्रगती बद्दल सांगत असतांना सुदर्शन क्रिया अतिशय गुणकारी आहे जिवनात श्वास किती महत्वाचे आहेत व श्वासावर नियंत्रण असल्यास आपल्या जिवनात किती आमुलाग्र बदल होतो व जिवन आनंदमय होऊन जाते असे अनेक साधकांनी आपले अनुभव सांगितले .

पुढील आनंद अनुभुती शिबिर हे 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या दरम्यान शिव पार्वती मंगल कार्यालय कौठा येथे सकाळी 5.30 ते 8.30 या वेळात होणार आहे व हे शिबिर सहा दिवसाचे आहे या शिबिरास उपस्थित राहण्यासाठी पूर्व नोदंणी आवश्यक आहे व वयोमर्यादा 18 + आहे.

तरी जास्तीत जास्त संख्येने पुढील होणा-या शिबिरा रजिस्ट्रेशन करुन आपली शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक प्रगती करुन घ्यावी असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक तथा सुप्रसिद्ध भागवताचार्य व रामायणाचार्य ज्ञानेश भक्त महेश महाराज शेवाळकर व हदगांव आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व टीमने केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button