नवीन नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नांदेड महानगरपालिकेचे माजी गटनेते व कौठा-असर्जन प्रभागाचे नगरसेवक डॉ.अभिषेक भाऊ सौदे यांना मानद डॉक्टरेट पदाचे सन्मान मिळाल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले.
विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या सभागृहात डॉ .अभिषेक सौदे यांना शुभेच्छा देण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व डॉ पी.विठ्ठल व डॉ.नागोराव कुंभार लिखित सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही पुस्तक देऊन डॉ अभिषेक सौदे यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अधिकारी कर्मचारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष काळबा हानवते, विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप पाईकराव ,शिवराम लुटे, प्रा.राजपाल चिखलीकर ,प्रा..शिंदे,संदिप ऐडके, अनिल सोनकांबळे जालिंदर गायकवाड ,मोहन हंबर्डे , बंडू कांबळे ,बालाजी शिंदे ,सुनील कांबळे ,संभाजी हंबर्डे ,जनार्दन गवंदे ,शैलेश कांबळे,रशीद खान,प्रदिप बिडला, यांच्या सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. या सन्माना बद्दल डॉ.अभिषेक सौदे यांनी विद्यापीठचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून ऋण व्यक्त करून आभार मानले.