नांदेड,गोविंद मुंडकर। नांदेड जि.प.च्या माजी सदस्या डॉ. सौ. मीनल पाटील खतगांवकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा आज नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्याकडे पाठवला आहे.
मी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे यापुढे भारतीय जनता पक्षाचे कार्य करु इच्छित नाही त्यामुळे मा. जिल्हाध्यक्षांनी माझ्या प्रथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती डॉ. सौ. मीनल पाटील खतगांवकर यांनी जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.