नवीन नांदेड| श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपूरी नांदेड मध्ये तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स (EXTC)मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी अनुज अग्रवाल, यांनी देश पातळीवर एस.जी.जी.एस.संस्थेची गुंणवत्ता सिद्ध करत गुरुजनांचे मार्गदर्शन आणि स्वतःचे कठोर परिश्रम व जिद्धीच्या जोरावर अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या लिनक्स (Linux) फाउंडेशन मेंटॉरशिप, एल.एफ.एक्स. (LFX)प्रोग्राम मधील यशाला गवसणी घातली आहे,त्यासाठी त्याला १२-आठवड्यांच्या कालावधीसाठी (तीन महिने) ₹ २.५ लाख (अंदाजे ३,००० डॉलर) स्टायपेंड मिळालेले आहे.


ही कामगिरी विशेषत: निवड प्रक्रियेच्या अतिउच्च काठीण्य पातळी मुळे लक्षात घेण्याजोगी आहे. या स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी विद्यार्थ्यामधील तांत्रिक कौशल्याचा कस लागतो. या जागतिक पातळी वरील स्पर्धेत पाच टक्के (५%) पेक्षा कमी अर्जदार निवडले जातात आणि बहुतेक निवडी पारंपारिकपणे जगातील प्रतिष्ठीत संस्था व आय.आय.टी. (IITs) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्या मधून होतात. प्रतिष्ठित क्लाउड नेटिव्ह कंप्युटिंग फाउंडेशन (CNCF) प्रकल्पावर काम करत, एस.जी.जी.एस. संस्थेमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी अनुज अग्रवाल हा एल.एफ.एक्स. (LFX) प्रोग्राम मेंटॉरशिप टर्म-३, २०२४ साठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील फक्त दोन भारतीयांपैकी एक ठरला आहे.


या स्पर्धेत जगभरातून जवळ पास १०० ते १५० तर भारतातील २५ ते ३० विद्यार्थ्याची निवड होत असते. अनुज अग्रवाल यास संस्थेचे संचालक डॉ. मनेश ब.कोकरे यांचेसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागीतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.त्याच्या या यशा बद्धल संस्थेचे संचालक डॉ. मनेश ब. कोकरे,विविध अधिष्ठाता,विभाग प्रमुख,कर्मचारी, व विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले.




