श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मौजे लिबायत येथिल महिला सरपंच उज्वला मनोहरसिंग चुंगडे यांच्या विरुद्ध ५ विरूद्ध २ ने अविश्वास ठराव ११ मार्च रोजी पारीत करण्यात आला होता. मात्र या ठरावाच्या विरुद्ध चुंगडे यांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते दोन्ही बाजूतील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ११ मार्च २४ रोजी च्या विशेष सभे मधील कामकाज व मंजूर ठराव वैधरित्या पारित न झाल्यामुळे तो रद्द ठरविण्यात येते आहे. असा आदेश दिनांक २१ ऑगस्ट रोजी काढल्याने लिंबायतच्या महिला सरपंचाला जीवनदान मिळाले आहे.
लिबायत नेर ही ७ सदस्यीय गट ग्रामपंचायत आहे.येथील महिला सरपंच यांच्या विरोधात अनेक कारणे देत दिनांक ४ मार्च २४ रोजी ५ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता,त्यावर लिबायत येथिल ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ११ मार्च रोजी तहसीलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात हात उंचावून झालेल्या मतदानात ५ विरूद्ध २ ने अविश्वास ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ जोडून विधीतज्ञ एस. एस. क्षिरसागर यांनी सात सदस्य ग्रामपंचायत मध्ये बहुमत ५.२५ मतावर येत असल्याने अपूर्ण अंक एक मानला जाऊन अविश्वास ठराव पारित करण्यासाठी सदस्य संख्या सहा आवश्यक असल्याचा दाखला दिला.
त्यामुळे परित झालेला ठराव २/३ चे बहुमत पूर्ण होत नसल्याची बाब निर्देशनात आणून देत पारित झालेला ठराव कायद्याच्या वैधानिक तरतुदीच्या विरुद्ध आणि वस्तुस्थिती विरुद्ध असल्याचा लेखी युक्तिवाद केल्याने नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी दोन्ही बाजूतील वादी प्रतिवादी यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर लिंबायत येथील महिला सरपंच सौ.उज्वला मनोहरसिंह चुंगडे यांनी दाखल केलेला प्रस्तुतचा अर्ज मान्य करत ११ मार्च २४ रोजीच्या विशेष सभेमधील कामकाज व मंजूर ठराव वैधरित्या पारित न झाल्यामुळे तो रद्दबातल ठरविण्यात येते आहे. सर्व संबंधितांना कळून संचिका बंद करावी व अभिलेख लक्षात जमा करावी असे आदेश दिनांक २१ ऑगस्ट रोजी काढल्याने सरपंच सौ. उज्वला मनोहर सिंह चुंगडे जीवनदान मिळाले आहे. या प्रकरणी संरपच सघटनेचे तालुका अध्यक्ष बाळू पवार यांनी सहकार्य केल्याचे सरपंच यांनी सागितले.